धामणी फाट्याजवळ अपघात होवून एक जण जखमी झाल्याची घटना दि. 26 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेची माहिती गोपाल् यादव यांनी सास कंट्रोल रूम इंझोरीचे अजय ढोक यांना दिल्यानंतर समृद्धी रुग्णवाहिका श्याम घोडेस्वार यांनी तात्काळ पोहचून रुग्णवाहीकेद्वारे सदर रुग्णास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.