मुंबई: मुंबईतील 'शिवसेना भवन' या ठिकाणी शाखाप्रमुखांची बैठक बैठकीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2025
मुंबईतील 'शिवसेना भवन' या ठिकाणी शाखाप्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत 'उद्धव ठाकरे' मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुख या बैठकीला उपस्थित असतील. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आमदार आणि खासदारांची तसेच जिल्ह्यातल्या जिल्हाप्रमुखांची बैठक 'मातोश्री'वर पार पडली होती. त्या बैठकीनंतर आता ही संघटनात्मक बैठक होत आहे.