हिंगणघाट: शहरातील जेवरीया शेखने महाराष्ट्राचे नाव उंचावले:श्रीनगरमध्ये पटकावले ऐतिहासिक रजतपदक
हिंगणघाट स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत राष्ट्रीय वूशु स्पर्धा २०२५-२६ श्रीनगर राज्य जम्मू द्वारा आयोजित नुकताच जिल्हा क्रीडा संकुल श्रीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय वूशु स्पर्धांमध्ये क्रीडा भारती क्लब तथा द फायटर प्लॅनेट क्लब हिंगणघाट येथील सतरा वर्षाखालील खेळाडू जवेरीया सलीमोद्दीन शेख या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर तीन विरोधकांना बाद करत व दोन विरोधकांशी कठीण संघर्ष करत आणि अत्यंत सुंदर प्रदर्शन करत महाराष्ट्राला रजत पदक प्राप्त केले आहे.