नौपाडा भागात महिलेची छेड काढणाऱ्या नशेडी व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती ठाण्यातील समाजसेवक संगम डोंगरे यांनी आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 9च्या सुमारास एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्री उशिरा घडली. सदरचा प्रकार समजताच संगम डोंगरे यांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. तसेच 112 क्रमांकावर कॉल करून पोलिस मदत मागवून सदर व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले.