नागपूर ग्रामीण: झुडपी जंगल जागेचा केला करोडोचा सौदा, फसवणूक करणाऱ्या विरुद्ध बेलतरोडी ठाण्यात गुन्हा दाखल
मोतीलाल चौधरी हे यांची अलायन्स रियालिटी नावाची भागीदारी फर्म आहेत. यांची आरोपी रमणाकर कोरपाटी, मधुकर कोरपाटी, श्रीनिवास कोरपाटी यांच्यासोबत ओळख झाली होती. आरोपी रमणाकर याने वरोडा येथील जागा विकायची आहे असे सांगून 13 कोटी 44 लाख 65 हजार 60 रुपयांमध्ये सौदा केला. दरम्यान मोतीलाल यांनी आरोपींना 1 करोड 71 लाख रुपये देऊन टोकन पत्र केले. आरोपींनी विक्रीपत्र बनवून दिले नाही.