लाखांदूर: रायल्टी शिवाय वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंग हात पकडला ;बोथली गावातील घटना
सकाळच्या सुमारास परिसरातील चुलबंद नदी घाटातून अवैध रित्या वाळू उपसा करून रॉयटीविना वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर रंगेहात पकडला. ही कारवाई तारीख 11 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता सुमारास भंडारा पोलीस कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील बोथली गावात केली या कारवाईत तालुक्यातील धर्मापुरी येथील पुरुषय यादवराव बोरकर वय 25 या ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध विविध कलमानखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण सात लाख 66 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे