खालापूर: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला खालापूर तालुक्यातील गोठीवली येथील घरातून गाण्यातून दिला पाठिंबा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. सकल मराठा समाज बांधवांचे वतीने पाठिंबा दिला जात आहे. त्यातच सध्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. त्या ठिकाणी पारंपारिक वाद्यांच्या तालावर मनोज जरांगे पाटील यांना खालापूर तालुक्यातील गोठीवली गावातील कुटूंबाने गाण्याच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे.