पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय - अँड. प्रकाश आंबेडकर
पंतप्रधान मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरले आहे. मोदी यांच्या स्वत:च्या इगोमुळे देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण याला धक्का बसलाय. मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय. भारत जगभरातून जे ऑईल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ८० टक्के नफा जवळपास ४४ हजार कोटींचा नफा हा फक्त अंबानीला होतोय. हे भारताच्या सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांविरोधात एनार्कीचा ग्रामर आहे. अशी टीका आज सोमवारी दुपारी २ च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.