अर्जुनी मोरगाव: सामाजिक नाटक म्हणजे सुखी संसाराची गुरुकिल्ली:- महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे
सादर होणाऱ्या तीन अंकी सामाजिक नाटक म्हणजे सामाजिक प्रबोधना सोबतच सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद च्या महिला व बालकल्याण सभापती तथा इटखेडा क्षेत्राच्या जि.प. सदस्य पौर्णिमा उमाकांत ढेंगे यांनी केले.तिडका / करड येथे आयोजित संगीत नाटक " बापाचे काळीज" या सामाजिक नाटकाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून पौर्णिमा ढेंगे बोलत होत्या.