अकोट: पालिका निवडणुकीतील उमेदवाराचा परतवाडा नजीक अपघात; अपघातात महिला उमेदवार ठार; सर्वत्र हळहळ
Akot, Akola | Nov 29, 2025 अकोट नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवाराचा परतवाडा नजीक शनिवारी अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या अपघातामध्ये या निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवार ठार झाल्याने अकोट शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर अकोट नगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगात असतानाच असा दुःखद प्रसंग घडल्याने निवडणुकीवरती देखील दुःखाचे सावट पसरले आहे तर या अपघातामध्ये उमेदवार महिलेचे पती देखील जखमी असल्याची माहिती असून एक लहान मूल देखील जखमी असल्याची माहिती आहे