सिकलसेल अॅनिमिया हा एक गंभीर अनुवांशिक रक्ताचा आजार असून, गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. हा आजार मुळापासून संपवण्यासाठी आणि रुग्णांना वेळीच उपचार मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर 'अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्ह्यातील जनतेला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.