घनसावंगी: सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई साहेबांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध :माजी मंत्री राजेश टोपे
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. बी.आर. गवई साहेब यांच्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी, लोकशाहीची पायमल्ली करणारा आहे. हा निंदनीय प्रकार आहे. संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नसलेल्या मनुवादी प्रवृत्ती न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तिमत्त्वावर हात उचलत आहेत. हा एका व्यक्तीवर नाही तर भारतीय न्यायपालिकेचा मोठा अवमान आहे. याबाबत ची पोस्ट माजी मंत्री राजेश टोपे यानी पोस्ट केली आहे