समुद्रपूर: शहरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये पाणी भरताना घसरून पडून जखमीचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
समुद्रपुर शहरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये पाणी भरताना घसरून पडून जखमी झालेल्या ४६ वर्षीय इसमाचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. समुद्रपुर शहरातील आंबेडकर वार्ड क्रमांक ३ येथील रहिवासी उमेश रामटेक वय ४६ वर्ष हे घरी पाणी भरत असतांना त्यांचा तोल जाऊन जमिनीवर पडले त्याच्या जबर मार लागला त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचारादम्यान मृत्यू झाला यासंबंधी समुद्रपुर पोलिसांना कागदपत्रांवरून मर्ग दाखल केला