दारव्हा: शहरातील कविता नगर मधील हनुमान मंदिरातील मूर्तीच्या चांदीच्या डोळ्यांची चोरी,सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद
दारव्हा (शहर प्रतिनिधी) : शहरातील कविता नगर येथील हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली असून मंदिरातील हनुमंत मूर्तीचे चांदीचे दोन डोळे, एक चांदीचा टीका आणि गणपती मूर्तीचा एक चांदीचा डोळा असा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.ही घटना दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता घडली. मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा स्पष्टपणे कैद झाला आहे.