कणकवली: प्रवासी महिलेने खाजगी बसचालकास चोपले : अश्लिल व्हिडीओ पाठवणे पडले महागात ; कणकवलीतील घटना
मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या चालकास कणकवली तालुक्यातील दोन महिलांनी मिळून थोबडावले. ही घटना शहरातील तिकीट बुकींग सेंटरनजीक घडली. मात्र, या प्रकाराची आज गुरुवार 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कणकवली पोलीस स्थानकात कोणतीही नोंद झालेली नव्हती.