पाथर्डी: पाथर्डीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा -100 टन उसाच्या चाऱ्यांची मदत...!
पाथर्डीतील पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यावतीने शंभर टन उसाची मदत.पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. टाकळीमिया येथून जवळपास १० ट्रैक्टर ट्रॉली पाथर्डीकडे पाठवण्यात आला आहे.