उदगीर: शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावेच लागेल,आमदार रोहित पवार
Udgir, Latur | Oct 2, 2025 शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उदगीर,जळकोट तालुक्यातील नुकसान ग्रस्त गावांना भेटी देऊन वस्तू स्थितीची पाहणी केली या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र पहायला मिळाले,सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता सरसकट भरीव मदत करावी,शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावेत,शेतकऱ्यांना पीक विमा लागू करावा,शेतकऱ्यांना सरकारने मदत दिली नाही,कर्ज माफ केले नाही तर येत्या १२ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरणार असल्याचे आमदार रोहित पवार पत्रकारा समोर बोलताना सांगितले