कळमनूरी: दांडेगावचा सर्जा आणि करोडीच्या लखन नावाच्या बैलाने मालकाला मिळवून दिली फॉर्च्युनर कार आणि चांदीची गदा
दांडेगाव ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील साईनाथ कराळे यांचा सर्जा बैल आणि छ.संभाजीनगर जिल्ह्यातील करोडीच्या सर्जेराव चव्हाण आणि मनोहर चव्हाण यांच्या ट्रिपल केसरी लखन नावाच्या बैलाने सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शंकर पट स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावून फॉरच्यूनर कार व चांदीची गद्दा मिळवून दिल्याची माहिती आज दि.11 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे,मुंबई येथे मंत्रालयात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या बक्षिसाचे वितरण होणार आहे.