निवडणुकीच्या दिवशी काहीजणांनी केलेले आरोप हे केवळ राजकीय नाटक आहे. सकाळपासून बुलढाणा शहर पोलिसांच्या छावणीत बदलल्यासारखं वातावरण होतं. हे शहर शिक्षित आहे, शिस्तबद्ध आहे, पण पोलिसांची अशी दहशत मी गेल्या ४० वर्षांच्या राजकारणात कधी पाहिली नव्हती. सतत सीएम ऑफिसकडून येणारे फोन, बाहेरचे पोलीस, एसआरपी, हे सगळं का उभं केलं हे लोकांना स्पष्ट दिसत होतं.बुलढाण्याची जागा म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेषा, इथे विजय शिवसेनेचाच होणार हे निश्चित आहे. असे मत आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.