इंदापूर तालुक्यातील आजोती, सुगाव, पडस्थळ, शहा, माळवाडी आणि कांदलगाव परिसरातील भीमा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने नदीकाठावर धाड टाकत पळ काढणाऱ्या बोटींचा पाठलाग केला.