जालना: ब्राम्हण समाज भाजप विरोधात आक्रमक; कमळाला मतदान न करण्याचा निर्धार; सामाजिक कार्यकर्त्या रसना देहेडकर यांनी सुनावले
Jalna, Jalna | Jan 6, 2026 जालना येथील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आगामी महापालिका निवडणुकीत ब्राम्हण समाजातील एकाही व्यक्तीस उमेदवारी न दिल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ब्राम्हण समाजाचे मतदान नेहमीच भाजपला होत असून शिस्तबद्ध आणि निर्णायक राहिले आहे.असे असतांनाही उमेदवारी नाकारणे हा समाजावर झालेला अन्याय असल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्या सौ. रसना देहेडकर यांनी व्यक्त केली.त्यांनी भापजच्या नेत्यांनाही चांगलेच सुनावले.