शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाई देवीची मातंगी रूपात पूजा - हक्कदार श्री पूजक अजित ठाणेकर
नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाविद्या श्रीमातंगी माता रूपामध्ये पूजा बांधली आहे.या पूजेचे वर्णन म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई श्यामवर्णी आहे. देवीला तीन नेत्र असून देवीने माथ्यावर चंद्र धारण केलेला आहे.देवीने आपल्या चार हातांमध्ये भक्तांच्या शत्रुनाशासाठी अंकुश आणि तलवार शिवाय पाश आणि ढाल धारण केलेली आहे.रत्नालंकारांनी युक्त दयावंत असं आज देवीचे रूप भाविकांना पाहायला मिळत आहे.