धुळेतील पारोळा चौफुली येथे ट्रकचालक कैलास मराठे यांच्यावर दोन लुटारूंनी चाकू हल्ला करून लुटीचा प्रयत्न केला. नागरिकांनी एका आरोपीला पकडले, तर दुसरा फरार झाला. गंभीर जखमी मराठे यांच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांनी एसडीपीओ राजकुमार उपासे यांना निवेदन देत, फरार आरोपीला अटक आणि पारोळा चौफुलीवर कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे.