योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज यांच्या १२३ व्या पुण्यतिथी निमित्त गुरुवार ता.18 श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेटावर महंत रामगिरी महाराज यांची कीर्तन सेवा पार पडली.कीर्तन दरम्यान महंत रामगिरी महाराज यांनी सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध गंगागिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे अनुष्ठान करून लावला तेव्हापासून सरला बेट ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा सुरू झाला असे प्रतिपादन महाराजांनी केले.