हिंगणा: भीम नगर येथून हद्दपार आरोपीस अटक एमआयडीसी पोलिसांची कारवाई
Hingna, Nagpur | Nov 9, 2025 एमआयडीसी पोलीसांचे तपास पथक हे हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना माहिती मिळाली की, भिमनगर पाण्याचे टाकी जवळ एक हद्दपार ईसम ऊभा आहे. अशा माहितीवरून त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले, त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव राहुल गौतम राउत वय २२ वर्ष रा., वार्ड नं. ०४, भिमनगर, नागपूर असे सांगीतले. आरोपीचा अभिलेख तपासला असता,नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून हद्दपार असल्याचे निष्पन्न झाले.