नागपूर शहर: गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाची धडाकेबाज कार्यवाही, दोन अल्पवयीन ताब्यात लाखोंचा माल जप्त : विनायक गोल्हे पोनी यूनिट 5
गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 14 मार्चला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित रित्या फिरत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. व त्यांच्याकडून चोरीचे विविध गुन्हे उघडकिस आणत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोल्हे यांनी दिली आहे.