अंजनगाव सुर्जी: आठवडी बाजार परिसरात निवडणुकीच्या कारणावरून एकाचा खून;१२ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल
अंजनगाव सुर्जी येथील आठवडी बाजार परिसरात निवडणुकीच्या कारणावरून दिनांक २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १२:३० वाजताच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली याबाबत अंजनगाव सुर्जी पोलिसांनी १२ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला अंजनगाव सुर्जी.फिर्यादी चे वडील त्यांचे सोबती असे मत मोजनीच्या ठिकाणी गेले असता प्रभाग क्रमांक १० ब मध्ये उमेदवार शहनाज बानो अब्दुल सलिम ही उबाठा शिवसेना गटाकडुन उभी होती व नाजीया परवीन मोहम्मद इरफान ही निवडून आली.