उल्हासनगर: कल्याण पूर्व येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रॅली
आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेत मॉडेल कॉलेजचे विद्यार्थी मातोश्री गुंडाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गांधीजींचे विचार आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. या रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. विद्यार्थी आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.