प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी येथे स्टॉप डायरिया कॅम्पेन बाबत एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन.
7.8k views | Yavatmal, Maharashtra | Jun 13, 2025 यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांचे मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यात स्टॉप डायरिया कॅम्पेन दिनांक 16 जून ते 31 जुलै 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने डॉक्टर शुभम माडीवाले यांचे उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी येथे आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.