भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असतानाच, जमिनीच्या सर्वेक्षणात आणि संपादनात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. आज, १९ जानेवारी रोजी दुपारी १:३० वाजता दरम्यान जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात समितीने प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ज्या जमिनींवर २०२२ मध्ये पाणी नव्हते आणि आजही नाही, अशा जमिनी २०२५ मध्ये बोगस पद्धतीने.