रामटेक तालुक्यातील देवलापार अंतर्गत येणाऱ्या दुलारा येथील रहिवासी शुभम खेलन प्रसाद पारखी वय 30 वर्ष हा उच्चशिक्षित युवा शेतकरी बुधवार दिनांक 12 नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता पासून अप्पर तहसीलदार कार्यालय देवलापार समोर आमरण उपोषणाला बसला आहे.शुभम हा मेकॅनिकल इंजिनिअर असून प्रशासनाचा प्रतिसाद न मिळाल्याने हतबल झालेला शुभम हा उपोषणाला बसला आहे.