हिंगणघाट: केंद्रप्रमुखांना वर्ग दोनची पदोन्नती द्या:महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाची मागणी:आमदार कुणावार यांना दिले निवेदन
हिंगणघाट:जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून शैक्षणिक गुणवत्ता विकास तथा सनियंत्रणाचे काम करणाऱ्या केंद्रप्रमुखांना वर्ग दोनची पदोन्नती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने राज्य शासनास करण्यात आली यासंबंधी जिल्हाध्यक्ष अशोकराव आडे यांनी आमदार समिरभाऊ कुणावर यांना निवेदन दिले आहे.