जालना: गांधीनगर, अर्जुननगर परिसरात घरात पाणी घुसल्याने अन्नधान्य, कपडे, साहित्य नष्ट..
Jalna, Jalna | Sep 17, 2025 गांधीनगर, अर्जुननगर परिसरात घरात पाणी घुसल्याने अन्नधान्य, कपडे, साहित्य नष्ट.. सामाजिक कार्यकर्ते अमजद खान यांनी घराघरात अन्नदान करून दिला दिलासा. आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गांधीनगर, अर्जुननगर आदी झोपडपट्टी भागांमध्ये पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी असल्याने स्वयंपाकही होऊ शकला नाही आणि नागरिक उपाशीपोटी राहिल्याचे