खंडाळा: केसुर्डी नजिक रिक्षा आणि दुचाकीचा अपघात जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल
केसुर्डी नजिक रिक्षा आणि दुचाकीचा अपघात जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल खंडाळा तालुक्यातील केसुर्डी गावच्या हद्दीत शिरवळबाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर राजस्थानी ढाब्यासमोर बुधवारी दुपारी २ ते अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला आणि पुरुष असे दोघे आणि रिक्षा चालक अशा तिघा जखमींना लगेच तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी खंडाळा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले होते. त्यांनीही मदत केल्याचे सांगण्यात आले. I