लोहा: यळकोट यळकोट जय मल्हार.!
देवस्वारी,खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांनी घेतले दर्शन
"उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी" अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत बेल भंडाऱ्याची उधळण करीत पारंपारिक पद्धतीने यंदा माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेस आज मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले खंडोबाच्या व मानकर यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली यावेळी मानकरांचा गौरव करण्यात आला आहे.