सिल्लोड: शहरात बेवारस सापडलेल्या 22 वर्षीय तरुणीला सिल्लोड शहर पोलीस व माणूसकी समूहाने दिला मायेचा आधार
आज दिनांक 10 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी मध्ये एक 22 वर्षे तरुणी बेवारस फिरत असल्याची गोपनीय माहिती सिल्लोड शहर पोलिसांना मिळावी सदर ठिकाणी जाऊन तरुणीला ताब्यात घेऊन विचारपूस केले असता तरुणी नाव साक्षी दत्तू सोनवणे असे सांगितले मात्र दिला घरचा पत्ता सांगता आला नाही सिल्लोड शहर पोलिसांच्या मदतीने सदरील तरुणीला माणुसकी संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे