दिग्रस तालुक्यातील तिवरी गावात तननाशक फवारणीदरम्यान शेजारच्या शेतातील कापसाचे पीक जळाल्याने वाद होऊन शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी अनिल प्रकाश पवार (वय ३६, रा. तिवरी) यांच्या शेताशेजारील शेतात तननाशकाची फवारणी सुरू असताना त्यांच्या शेतातील कापसाच्या दोन ओळी जळाल्या. या नुकसानीची भरपाई मागितली असता आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत थपडा-बुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.