संघ व भाजप सोबत आतून संगणमत केलेले महाराष्ट्रातील नेते तुमचे भले करू शकणार नाहीत असे प्रतिपादन आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष अंभोरे यांनी तोरनाळा येथे पार्टीच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केल्याची माहिती दि. 18 ऑक्टोबर रोजी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वामनराव राऊत तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तर प्रमुख अतिथी जिल्हा उपाध्यक्ष संजय पडघन, जिल्हा सचिव केशव उचित, उपस्थित होते.