आज दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. जालन्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या उपस्थितीत आज पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्हे आढावा परिषद पार पडली. या परिषदेनंतर विविध गुन्ह्यांची उकल करून जलदगतीने तपास पूर्ण करणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.