केंद्र सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक ओळख’ या मोहिमेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘अपार’ कार्ड तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ८०६ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले. मात्र काही शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अजूनही २९ हजार ५५५ विद्यार्थ्यांना अपार आयडीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.