पोलादपूर: पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात आज सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध विकास कामांबद्दल आढावा बैठक पार पडली. यावेळी जल जीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, आरोग्य सेवा, डम्पिंग ग्राउंड यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी स्पष्ट, मुद्देसूद व वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या होत्या.