समर्थ कॉलनी (गोंदिया), खौरी/घर (लाखांदूर), केसलबाडा वा. (लाखनी) आणि मदनापूर (कुही, जि. नागपूर) येथील या चार अल्पवयीन मुलांनी संगनमत करून कॅप्टन जय याला लाथा-बुक्क्यांनी तसेच डिव्हायडरने गळ्यावर, पोटावर, कमरेवर आणि डोक्यावर क्रूर मारहाण केली. इतकेच नव्हे तर, लाकडी दांडूने डोक्यावर मारून दुपट्ट्याने गळा आवळला आणि हाताने गळा दाबून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.