महाड: सिकेटी हायस्कूल, पनवेल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली भेट
Mahad, Raigad | Sep 22, 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत आज सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास सिकेटी हायस्कूल, पनवेल येथे मोफत आरोग्य शिबिराचे व पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.