हिंगणा: हिंगणा येथील मेट्रो स्थानकाच्या बाधकामाला भूखंडधारकांचा विरोध
Hingna, Nagpur | Oct 30, 2025 मेट्रो विभागाने खाली भूखंडांचे मुल्यांकन आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करताच बळजबरीने भूखंडावर बांधकाम सुरू केले. मेट्रोच्या बळजबरी कृत्याला भूखंडधारकांनी तीव्र विरोध केला.लोकमान्य नगर ते हिंगणा दरम्यानच्या महामेट्रो स्थानकासाठी रस्त्यावरील खाली भूखंड घेण्याच्या सूचना खूप आधी मेट्रो विभागाने भूखंडधारकांना दिली होती. मात्र, आता खाली भूखंडांचे मुल्यांकन आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करताच बळजबरीने सदर भुखंडावर बांधकाम सुरू केले.