सावनेर तेलगाव रोडवरील घटना सावनेर-काटोल रोडवर पिकअप गाडी पलटी; जीवितहानी नाही, हितेश बनसोड यांची मदत सावनेर : सावनेर-काटोल मार्गावर आज पिकअप गाडी पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासह परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.