उमरखेड: वर्षांची प्रतीक्षा आणि उत्सुकता संपली ; ढाणकीत महिला राज
राजकीय पक्षांना व जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले होते. अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. अनेक पालिकांचं कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर ढाणकी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवार दि.६ रोजी दुपारी जाहीर झाले आहे.