नोव्हेंबर महिन्यातील लोकशाही दिन 3 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आला असून नागरीकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्ज जिल्हा/तालुका लोकशाही दिनामध्ये सादर केल्यानंतर विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनामध्ये 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठवावे असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दि. 26 ऑक्टोबर रोजी कळविले आहे.