सडक अर्जुनी: आशीर्वाद लॉन सडक अर्जुनी येथे आमदार सांस्कृतिक महोत्सवाला जि प अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री श्री. राजकुमारजी बडोले यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आशीर्वाद लॉन सडक अर्जुनी येथे दांडिया स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली.