चोपडा-अमळनेर रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ते कामाच्या दरम्यान शनिवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता एका लक्झरी बस चालकाच्या मुजोरीमुळे मोठा अनर्थ ओढवला असता. समोरून येणाऱ्या लक्झरी बसला जागा देण्यासाठी काचेच्या बाटल्यांनी भरलेला एक मोठा ट्रॉला रस्त्याच्या कडेला खाली उतरला आणि मातीत अडकला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक चालकाला मोठा आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला.