जळगाव शहरातील प्रेमनगर ते पिंप्राळा रोड दरम्यान असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ गौणखनिज वाळूची अवैध वाहतूक करताना जिल्हापेठ पोलिसांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली आणि वाळू असा एकूण ४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.